चिंबळी मधून दुचाकी चोरीला

0
159

आळंदी ,दि. १९ (पीसीबी) – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी मधून दुचाकी चोरीला गेली. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी १८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश सूर्यकांत वाले (वय ३२, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ६० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १४/ईक्यू ०९०८) कपारो कंपनी समोर पार्क केली होती. तिथून अज्ञातांनी दुचाकी चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.