चिंचवड, दि.२४ (पिसिबी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 245 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चिंचवडचे भाजप लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणूक शाखेने पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
मतदान कर्मचारी नेमणुकीसाठी इ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यालय अधिक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मतदान कर्मचारी प्रशिक्षण नियोजन व व्यस्थापन विभागासाठी कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, टपाली मतदानासाठी सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी भाडांर अधिकारी मुबारक पानसरे, मतदान यंत्रे, स्ट्रॉगरुमसाठी सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक कर्मचारी भत्ता वाटपसाठी लेखाधिकारी अरुण सुपे, वाहने परवाना देणे प्रशासन अधिकारी राजीव घुले, आचारसंहिता कक्षासासाठी कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, मिडिया सेलसाठी किरण गायकवाड, वाहन अधिग्रहण विभागासाठी कार्यव्यस्थापक कैलास दिवेकर, वाहतूक आराखडा व व्यस्थापनासाठी पीएमपीएमएलचे डीएमई दत्तात्रय माळी, उमेदवार खर्चाचे लेखे ठेवणे विभागासाठी लेखाधिकारी इलाही शेख आणि चिन्हांकीत मतदार यादी तयार करण्याच्या विभागासाठी सहाय्यक आयुक्त सिताराम बहुरे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी असे 12 अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षण नियोजन व व्यवस्थापनासाठी 7, टपली मतदानासाठी 11, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी 24, निवडणूक मतदान यंत्र व स्ट्राँग रूम 42, निवडणूक कर्मचारी भत्ता वाटप 12, वाहन परवाने व उमेदवार मतदान प्रतिनिधी ओळखपत्र वाटप 9, आचारसंहिता कक्ष 16, विविध भरारी पथके 18, मीडिया सेल 6 जण, निवडणूक वाहन सुविधा 7, वाहतूक आरखाडा व व्यस्थापन 8, निवडणूक खर्चाचे लेखे ठेवणे 12, चिन्हांकित मतदार यादी तयार करणे 36, निवडणूक विषयक संगणकीकरण 7, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयासाठी 18 अधिकारी, कर्मचारी अशा 245 अधिकारी, कर्मचा-यांची पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्ती केली आहे. या अधिकारी, कर्मचा-यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ग क्षेत्रीय कार्यालय येथे तत्काळ रुजू व्हावे. निवडणुकीचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पाडावे, असे आदेशात म्हटले आहे.