चिंचवड येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

0
157

चिंचवड,दि. 25 (पीसीबी)-  चिंचवड येथील वाल्हेकरवाडी रोड येथून दोघांना चिंचवड पोलिसांनी एक गावठी पिस्टल वदोन जिवंत काडतूसासह अटक केली. हि कारवाई चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि.24) हॉटेल कोल्हापुरच्या बाजुला करण्यात आला. किरण रमेश गालफाटे (वय 22 रा. मंगळवारपेठ, पुणे) व रोहन जयदिप चव्हाण (वय 19 रा. मंगळवारपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.याप्रकऱणी पोलीस शिपाई उमेश मोहिते यांनी चिंचवड फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीररित्या बंदूक घेऊन थांबले असतानो पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे एसा एकूण 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी आरोपींना अटक केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.