चालकाने कारचा दरवाजा अचानक उघडला; तेवढ्यात……

0
50

रावेत, दि. ०१ (पीसीबी) : कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने दुचाकीला धक्का लागून दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी निगडी प्राधिकरण येथील पीसीसीओई कॉलेज जवळ घडली.

आदित्य दत्तात्रय तरस (वय 22, रा. किवळे मुकाई चौक, रावेत) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 30) याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14/एचडब्ल्यू 4652 या कारमधील चालक सुमित (पुर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य व त्यांचा मित्रउ सुयश हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. ते निगडी प्राधिकरण येथील पीसीसीओई कॉलेज जवळ आले असता आरोपी कारचालक याने चालकाच्या बाजूकडील दरवाजाच अचानक उघडला. या दरवाजाचा धक्का लागून फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीवरून खाली पडले. आदित्य यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.