चापट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला दगडाने बेदम मारणार

0
173

चापट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला तीन ते चार जणांनी दगडाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) ताथवडे येथे घडली आहे.

याप्रकरणी सुरेश पांडू चव्हाण (वय 21 रा. लोंढे वस्ती ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी क्रिश व त्याचे दोन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरते व त्यांचा लहान भाऊ हे कामा निमित्त बाहेर जात असताना आरोपींनी फिर्यादी च्या लहान भावाला बोलावून घेत तो आम्हाला शिवीगाळ का करतो म्हणून त्याला चापट मारली. याचा जात फिर्यादी हे विचारण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत बुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगड डोक्यात घालून गंभीर जखमी केले. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.