चाकण मध्ये तरुणाकडे आढळले पिस्टल

0
52

पुणे, दि. २३ (पीसीबी) – चाकण येथे एका तरुणाकडे पिस्टल मिळाले. पोलिसांनी पिस्टल जप्त करत तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिक्रापूर रोड, चाकण येथे करण्यात आली.

राजेश व्यंकटी वाडेकर (वय 22, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विशाल वाजे (रा. रासे) आणि मेहबूब शेख (रा. वाकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश याने बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगले. याबाबत कारवाई करत चाकण पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल पोलिसांनी जप्त केले. राजेश याने हे पिस्टल विशाल वाजे आणि मेहबूब शेख यांच्याकडून आणले असल्याचे तपासात समोर आल्याने त्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.