चाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त

63

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाण्यात दोन आणि चिखली व वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका ठिकाणी गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी (दि. 30) करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये पोलिसांनी एक लाख 72 हजारांचा ऐवज जप्त केला.

खराबवाडी येथे केलेल्या कारवाईत संदीप बुधाजी बुरांडे (वय 35, रा, निघोजे, ता. खेड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 65 हजार 197 रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे.

आंबेठाण चौक चाकण येथे केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी 91 हजार 86 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी ललितकुमार लक्ष्मीकांत गंजेवार (वय 51, रा. आंबेठाण चौक, चाकण), हनुमान चौधरी, ओमप्रकाश बिष्णोई उर्फ ओमजी (दोघे रा. खालूंब्रे, ता. खेड) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हेत्रेवस्ती येथे केलेल्या कारवाईत सिद्धेश्वर दिनकर खाडे (वय 26, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार हजार 400 रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला.

गोडांबे चौक, रहाटणी येथील अमिता पान शॉप मध्ये केलेल्या कारवाईत 10 हजार 316 रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी मोहम्मद शरीफ कुरेशी (वय 43, रा. रहाटणी) याला अटक केली आहे.