चक्कर मारायला म्हणून नेलेली चारचाकी केली लंपास

0
59

पुणे, दि.९ (पीसीबी) – चक्कर मारायला म्हणून घेतलेली कार परस्पर लंपास केली आहे. ही घटना 20 डिसेंबर 2023 रोजी वाकी, पुणे येथे घडली आहे.

याप्रकरणी मधुकर बाबुराव दवंगे (वय 51 रा.चाकण, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरून संकेत बाबुराव इंगळे (रा. पारनेर, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नावावर असलेली 5 लाख रुपयांची कार (एमएच 14 के.एन.5548) ही गाडी चक्कर मारण्यासाठी घेवून जात ती परत न करता फिर्यादी यांची 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.