घरात घुसून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक

101

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – तरुणी घरात एकटी असताना तिच्या घरात जाऊन तरुणाने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी हिंजवडी परिसरात घडली.

दीपक शालील चव्हाण (वय 23, रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या 45 वर्षीय आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी फिर्यादी यांची मुलगी घरी एकटी होती. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने घराचा दरवाजा वाजवून दरवाजा उघडण्यास लावले. त्यानंतर अचानक घरात येऊन फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare