घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

0
208

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – घराच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. २३) सकाळी संत तुकाराम नगर पिंपरी येथे उघडकीस आली.

विशाल इराण्णा दुधाणी (वय ३०, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे असलेली १५हजार रुपये किमतीची बंद अवस्थेत असलेली दुचाकी त्यांच्या घराच्या पार्किंग मध्ये पार्क केली आहे. रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी ती दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.