घराचा दरवाजा उघडा दिसताच; चोरटे झाले खुश आणि मग……

73

मोशी, दि. २६ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातून 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 25) मध्यरात्री एक ते पहाटे सहा वाजताच्या कालावधीत संतनगर, मोशी येथे घडली.

अक्षय मोहन शेंडगे (वय 26, रा. संतनगर, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. मध्यरात्री एक ते पहाटे सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून दोन लॅपटॉप, पाकिट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, एटीएम कार्ड असा एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare