घरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला

125

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दिघी रोड भोसरी येथे घडली.

याप्रकरणी हर्षद प्रविणकुमार शहा (वय 31, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बुधवारी (दि. 29) रात्री साडेअकरा ते गुरुवारी सकळी साडेआठ वाजताच्या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या सेफ्टी डोअरचा कडी, कोयंडा तोडून आत प्रवेश केला. हॉल, बेडरूम मधील फर्निचरच्या शोकेस, कपाट आणि टेबलचे ड्राव्हर उचकटून चोरट्याने 85 हजारांची रोख रक्कम, 10 हजारांचा साऊंड बार, दोन हजारांचा एक ट्रीमर असा एकूण 97 हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.