घरफोडी करून दागिने, रोकड लंपास

0
215

पिंपळे निलख, दि. २४ (पीसीबी) – घरफोडी करून अज्ञातांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. २३) सकाळी नवीन डीपी रोड, पिंपळे निलख येथे उघडकीस आली.

अनुजा अविनाश कुलकर्णी (वय ३८, रा. नवीन डीपी रोड, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञातांनी लॅच लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील वॉर्डरोब उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.