घरफोडी करून एक लाख 60 हजारांचे दागिने चोरीला

0
76

घरफोडी करून चोरट्याने एक लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 23) पहाटे संत तुकाराम कॉलनी, मारुंजी येथे घडली.

अभिजित गोकुळदास मारवाडी (वय 38, रा. कस्पटे वस्ती, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी मारवाडी यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 60 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.