ग्लोबल अँग्रो फाउंडेशनच्या वतीने सतीश काळे यांचा सन्मान

0
61

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने काळे यांचा गुणगौरव.

पिंपरी, दि.९ (पीसीबी) – मा.शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ट्रस्ट यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
या वर्षी २०२३ – २४ चा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात तसेच समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यावर व शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान मिळावे यासाठी अनेक वेळा मुंडन आंदोलने रास्ता रोको आंदोलने करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वारंवार रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारा शेतकरी योध्दा तसेच महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या आत्मसन्मानासाठी न्याय हक्काची लढाई लढणारा प्रसंगी स्वतःला अटक झाली तरी मागे न हटणारा शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील निर्भीड कार्यकर्ता असा गुणगौरव करत महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय शरद जोशी विचार म्हणजे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष अंकुश भास्करराव काळे पाटील यांच्या पुढाकारातून शेतकरी संघटनेचे डॉ संदीप ओव्हाळ यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांना या वर्षीचा पुरस्कार सन्मान चिन्ह तसेच शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

यावेळी शेतकरी संघटनेच्या विविध विभागांचे मान्यवर तसेच कार्यकर्ते यांनी सतीश काळे यांच्या सामाजिक जीवनातील कार्याचा गुणगौरव आपल्या भाषणातून केला.
या प्रसंगी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक फाळके शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वरपे खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव रावसाहेब गंगाधरे,योगेश पाटील,प्रविण थोरात यांच्यासह शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.