ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला सुरु होता गॅसचा काळा बाजार

0
68

पुणे, दि. १९ (पीसीबी): नवलाख उंबरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला एक व्यक्ती मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत असे. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 17) रात्री करण्यात आली.

बाबाजी आनंदराव पडवळ (वय 50, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरेश जाधव यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पडवळ याने नवलाख उंबरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या एका गाळ्यात भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस चोरून काढला. त्यासाठी त्याने कोणतीही सुरक्षेची खबरदारी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.