ग्रामपंचायतची 500 मीटर लांबीची केबल चोरीला

0
32

शिरगाव, दि. 25 (पीसीबी) : ग्रामपंचायतच्या मालकीची 500 मीटर लांबीची केबल चोरीला गेली. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी चांदखेड, मावळ येथे उघडकीस आली.

ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ बाळू केदारी (वय 34, रा. चांदखेड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ग्रामपंचायतचा सरकारी पंप चालू करण्यासाठी धामणे येथील हनुमंत गराडे यांच्या शेतात असलेल्या पंप हाऊस येथे गेले होते. यावेळी पंप हाऊस ते पवना नदीच्या विहिरी पर्यंत केलेली 500 मीटर लांबीची 80 हजार रुपयांची नवीन केबल अज्ञात चोराने चोरून नेल्याचे उघडकीस आले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.