गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

50

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 18) पहाटे सव्वापाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली.

आदिल रशीद शेख (वय 25, रा. रामवाडी, जि. अहमदनगर), रहमुद्दीन मेहबूब कुरेशी (वय 30, रा. माजलगाव, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीकांत एनगुंदल यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन कारमध्ये गोवंश सदृश्य मांस विक्रीसाठी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे सापळा लावून दोन कार ताब्यात घेतल्या. त्यामध्ये गोवंश सदृश मांस आढळून आले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.