गॅसच्या काळाबाजार प्रकरणी तरुणाला अटक

0
86

बेकायदेशीर रित्या गेस्ट ट्रान्सफर करून गॅस सकाळ बाजार करणाऱ्या एका 19 वर्षे तरुणाला अटक करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 सोमवारी (दि.20)खेड तालुक्यातील खराबवाडी येथे करण्यात आली.

अमर संतोष नायक (वय 19 रा. खराबवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सुधीर दांगट यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सुरक्षिततेच्या कोणत्याही बंदोबस्ताशीवाय व जाणीवपूर्वक मोठ्या सिलेंडर मधील गॅस छोट्या सिलेंडर टाकीमध्ये भरत होता. यावेळी पोलिसांनी छापा टाकल. यावेळी त्याच्याकडून पाच सिलेंडर, वजन काटा ,गॅस काढण्याचे मशीन असा एकूण 12 हजार 250 रुपयांच मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.