गॅसचा काळाबाजार केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा

0
117

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – मोठ्या सिलेंडरमधून छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस भरणाऱ्या तरुणावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार म्हाळुंगे नांदे रोड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे.

संतोष मनोहर बंडगर (वय 22 रा. नांदगाव) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकऱण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवी पावर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यात असलेला गॅस हा बेकायेदीशर रित्या व धोकादायक पद्धतीने मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. त्याच्याकडून पोलिसांनी 27 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.