गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

0
85

गॅसचा काळा बाजार करणाऱ्या 19 वर्षीय तरुणावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 5 ने बुधवारी (दि.10) रावेत येथील जय मल्हार गॅस सेल्स सर्वीस दुकानात केली आहे.

रामेश्वर भारत शिळे (वय 19 रा.रावेत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई भरत माने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा घरगुती गॅस सिलेंडरमधून लोखंडी रिफील नोजलच्या साहाय्याने गॅस बाहेर काढत होता. यावेळी त्याने कोणतीही खबरदारी पाळली नव्हती. या कारवाईत 16 हजार 700 रुपयांचा गॅस जप्त केला .रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.