गॅरेज मधून 64 हजारांचे पार्ट चोरीला

0
100

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – मुळशी तालुक्यातील सुस येथे एका गॅरेजमधून 64 हजार रुपयांचे स्पेअर पार्ट चोरीला गेले. ही घटना 20 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत घडली.

राहुल प्रकाश कोईक (वय 35, रा. सुस, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल हे सुस येथील सह्याद्री मोटर्स या वर्कशॉप मध्ये काम करतात. त्यांच्या वर्कशॉपमधून अज्ञात चोरट्याने 64 हजार 601 रुपये किमतीचे स्पेअर पार्ट चोरून नेले. याप्रकरणी 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.