गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे मनोज जरांगेना अपशब्द !

0
46

दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या पाच दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण काल संपलं. राज्य सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. त्यांच्या या आंदोलनावर आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने सडकून टीका केली. “समाजाच्या पाठिमागे लपतोस, दिशाभूल करतोस हे असं होण नव्हे जरांग्या. मी तुला खरं सांगते की, अशा प्रकारे दबाव टाकून, दडपशाही करुन मराठा बांधव सरसकट ओबीसी होऊ शकत नाही. ही सगळी दिशाभूल आहे” असं गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी म्हणाल्या.

“माझ्या बांधवांना सांगणं आहे की, तुम्ही अभ्यास करा. मोदीजींनी दिलं ते खरं आरक्षण आहे. EWS आरक्षण आहे, त्या आरक्षणाचा कितीतरी मराठा बांधवांना फायदा झाला. आता मराठा बांधव मागे गेले आहेत, याचा अभ्यास करा. याच्या बातांना बळी पडू नका. हा समाजाच्या जीवावर घाणेरडे शब्द बोलतो” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने केला.

“माझ्या मराठा समाजाचे भाऊ असे घाणेरडे शब्द आई-बहिणीवरुन बोलतात का? हे नीचपणाच वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभी करतोय, दिशाभूल करायची, महोरक्या म्हणून समोर यायचं. लोकांना आई-बहिणीवरुन बोलतोय, नको ती आश्वासन द्यायची” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने केला.“मी घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या समाजासाठी मी हे करीन. जरांग्या तुझ्यातला मी संपवं आधी, तू कोण आहेस? बोलना कायदा देईल, संविधान देईल. संविधानानुसार घेईन. संविधानात जे आहे तेच घेणारना. त्याच्या बाहेरच काय देणार आहेस का, माझ्या बांधवांना. ए बस करायचा नाटक” अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “आझाद मैदान ताबडतोब खाली कर तू ऐकला नाही, म्हणून कोर्टाने लाइन दाखवली. गुलाल उधळून दिशाभूल करतोस” असं गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी म्हणाल्या. आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच सर्व श्रेय मराठा समाजाला दिलं.