गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला अटक

0
195

पुणे, दि. २३ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे गुटखा साठवणूक केल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका तरुणाला अटक केली. त्याला गुटखा साठवून ठेवण्यासाठी खोली उपलब्ध करून देणाऱ्या जागा मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) सकाळी साडेसात वाजता खराबवाडी येथील केसवडमळा येथे करण्यात आली.

अभिषेक उमेशचंद्र गुप्ता (वय 25, रा. मुळेवस्ती, बिरदवडी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राजू केसवड (वय 32, रा. खराबवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवले. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 48 हजार 250 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

पोलिसांनी अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याला गुटखा साठवून ठेवण्यासाठी राजू केसवड याने त्याची जागा कोणताही भाडेकरारनामा न करता उपलब्ध करून दिली. त्यामुळे राजू केसवड याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.