गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

0
119

खेड, दि. ८ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 7) सायंकाळी खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथे करण्यात आली.

महेशकुमार प्रभुदयाल पाठक (वय 42, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश गायकवाड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने तंबाखूजन्य गुटखा व सुगंधित सुपारी पदार्थांचे सेवन, विक्री यावर बंदी घातली आहे. असे असताना देखील आरोपी महेशकुमार पाठक याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छापा मारून 31 हजार 387 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.