गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

228

सुस, दि. १६ (पीसीबी) – गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) सायंकाळी मुळशी तालुक्यातील सुस येथे करण्यात आली.

सवईराम थानाराम देवासी (वय 21, रा. सुस, ता. मुळशी. मूळ रा राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह गोवर्धन बिरमाराम देवासी, राजू (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुरेश जायभाये यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सवईराम याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विकला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिटचारने सुस येथे छापा मारून कारवाई करत सवईराम याला अटक केली. त्याने हा गुटखा गोवर्धन आणि राजू यांच्याकडून आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून पाच हजार 536 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.