गावाकडे जात नाही म्हणून मित्रावर वार

0
97

मित्र गावाकडे जात नाही म्हणून सहकारी मित्राने मित्रावर धारदार कटरने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वार करणाऱ्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री दहा वाजताच्या सुमारास शास्त्री चौक, भोसरी येथे घडली.

दीपक अशोक कांबळे (वय 32, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बाबासाहेब उर्फ छोटू पांडुरंग सागर (वय 23, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि आरोपी कांबळे हे एकत्र राहतात. फिर्यादी हे केटरिंगचे काम करतात. ते मागील काही दिवसांपासून त्यांच्या गावी गेले नव्हते. ते गावी जात नसल्याने कांबळे याने सागर यांच्याशी वाद घातला. त्यावरून कांबळे याने सागर यांच्यावर लोखंडी कटरने वार केले. यात सागर यांच्या गळ्यावर, छातीवर गंभीर दुखापत झाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.