गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने एकास मारहाण

169

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने सहा जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री नागेश्वर नगर, मोशी येथे घडली.

निलेश सोपान तळेकर (वय 35, रा. नागेश्वर नगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल तोत्रे (वय 27), गणेश तोत्रे (वय 29), अजय मुंढे (वय 19, सर्व रा. नागेश्वर नगर, मोशी), शुभम साबळे (वय 25, रा. शिवाजीवाडी), दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोर थांबले असताना त्यांनी आरोपी गणेश याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यावरून गणेश आणि फिर्यादी यांच्यात किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी अतुल याने फिर्यादी यांना सोसायटीच्या गेटच्या बाहेर बोलावून अंगावर गाडी घालून मारहाण केली. अन्य आरोपींनी फिर्यादीला पाईपने मारहाण करून जखमी केले. शुभम साबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.