गाडी पार्किंग च्या कारणावरून पतीपत्नी ला मारहाण

0
53

काळेवाडी, दि. ७ (पीसीबी) – गाडी पार्किंग च्या कारणावरून झालेल्या भांडणात पतीपत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सात जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार रविवारी (दि.4) काळेवाडी येथील साई नगरी सोसायटीच्या पार्किंग मध्ये घडली.

याप्रकरणी शहाजीराव नानासाहेब चव्हाण (वय 45 रा काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मननकुमार रामेश्वर सिंह, त्यांची 2 मुले, दोन महिला आरोपी. तसेच ब्रिजेशकुमार सिंह, निरू ब्रिजेश कुमार सिंह या सात जानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी.दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांनी त्यांची चार चकी गाडी पार्क केली होती. यावेळी पार्किंग च्या कारणावरून आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी व त्यांची पत्नी यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.