गाडीची हवा सोडल्यावरून महिलांचा घरात राडा

0
397

दिघी, दि. १९ (पीसीबी): एका महिलेने गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरून दोन महिलांनी हवा सोडणाऱ्या महिलेच्या घरात जाऊन राडा घातला. महिलेसह तिच्या पती व मुलाला मारहाण करून घरातील वस्तू फोडून त्याचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री पावणे आठ वाजता आणि रविवारी (दि. 18) दुपारी पावणे एक वाजता रुणवाल पार्क, दिघी येथे घडली.

याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने गाडीची हवा सोडली. त्या कारणावरून आरोपी महिलांनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी, त्यांचे पती आणि मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना नखाने ओरडून जखमी केले. तसेच घरातील टीव्ही, लॅपटॉप, कुंडी फोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.