गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

54

मावळ, दि. २० (पीसीबी) – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) दुपारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे करण्यात आली.

अक्षय सुनील नरवडे (वय २४, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिनकर भुजबळ यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे येथे एकजण गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५८६ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ३१ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.