गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

82

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – गांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 21) सायंकाळी भोसरी येथे करण्यात आली.

सनी बबन शिंदे (वय 27, रा. लांडगे नगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बाळू श्रीधर कोकाटे (वय 39) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ गांजा विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून आरोपी सनी शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार हजार 400 रुपयांचा 176 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare