महाराष्ट्र , दि. ८ (पीसीबी) – आपल्याकडे राईट टू प्रायव्हसी हा कायदा आहे आणि हा कायदा संसद आणि सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. ज्यावेळी एखाद्या आरोपीचा मोबाईल घेतला जातो तेव्हा तो फक्त पोलिसांकडून कोर्टाला दाखवला जातो. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला तो मोबाईल दाखवला जात नाही. अशी माहिती देत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांची बाजून मांडत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये 234 फोटो 29 व्हिडिओ अन् 1 हजारहून अधिक नग्न फोटो आढळल्याची धक्कादायक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तसेच, अनेक धक्कादायक माहिती चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेतून उघड झाली आहे. दरम्यान, सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना कायद्याची आठवण करुन दिली आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
आपल्याकडे राईट टू प्रायव्हसी हा कायदा आहे आणि हा कायदा संसद आणि सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. ज्यावेळी एखाद्या आरोपीचा मोबाईल घेतला जातो तेव्हा तो फक्त पोलिसांकडून कोर्टाला दाखवला जातो. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला तो मोबाईल दाखवला जात नाही. त्यामुळे मोबाईलमधील डेटा बाहेर लीक केल्यास तो गुन्हा असल्याचं हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्येच म्हटले आहे ते मी म्हणत नाही.
त्यामुळे आमच्या पक्षातील जे कोणी सदस्य असतील त्यांची जबाबदारी माझीच आहे. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमचीच आहे. मात्र, सदानंद सुळे यांनी काही सरकारमध्ये गडबड केली, तर ती माझी जबाबदारी आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यात काय करतात त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही. तसेच आम्ही प्रोफेशनल पद्धतीने काम करतो असेही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
नेमकं काय म्हणाल्या चाकणकर?
गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी प्रांजल यांनी मुलींना चित्रपटात काम देता असे अमिष दाखव बोलवून घेतले होते. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केली. मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ, 1497 फोटो नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करुन नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे फोटो, व्हिडिओ आहेत. या मुलींना पटवण्यासाठी आरूष नावाचा माणूस ठेवला होता. चित्रपटात काम देऊन त्या मुलीना बोलवलं जात होत. यात मानवी तस्करी झाली आहे, त्यामुळे आता एसआयटी स्थापन कारणासंदर्भात पत्र दिल्याची माहिती चाकणकर यांनी यावेळी दिली. अनैतिक शोषण, मानवी तस्करी आणि महिलांचा अनैतिक शोषण केल्याच समोर आलं असून 28 वेळा रूम बूक केली होती.
याप्रकरणी, महिलांना कसं आणला, त्यांचा कसा वापर केला याची तपासणी होण गरजेचं आहे. मोबाईल आणि फोन कॉलची चौकशी करण्यात यावी. एका रेव्ह पार्टीसंदर्भात हे प्रकरण असलं तरी मानवी तस्करीचा प्रकार आहे. पुण्यात हा प्रकार असल्याने हे वाईट आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, केवळ पार्टीच्या नावाखाली ही तस्करी सुरू आहे. देशातलं सगळ्यात मोठं मानवी तस्करीचं हे रॅकेटू असू शकते, असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.
हे फार मोठं रॅकेट आहे, हे उघडकीस येईल, अनेक व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींचा वापर केला गेला आहे. पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी, काही मुलींनी तक्रार दिली आहे. अनेक वर्षांपासून सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात असून लोणावळा, जळगाव, साकीनाका येथे हे सगळं प्रकरण सुरू असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.