खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजप प्रचंड आक्रमक

0
520
  • माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या निवासस्थानातील बैठकीत आग ओकणारी भाषणे

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची जागा भाजपलाच मिळावी यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी अनेकांनी बोलताना बारणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि भाजपला उमेदवारी मिळाली नाही तर प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत बारणे यांचे काम करणार नाही, असा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. विधानसभेला पण कमळ आणि लोकसभेला सुध्दा कमळ असा निर्णय सर्वांनी केला. भाजपला विश्वासात घेत नसल्याने खासदार बारणे यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके, अण्णा बनसोडे यांच्या पाठोपाठ भाजपच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील पदाधिकाऱ्यांनी बारणे यांच्या विरोधात ठोस भूमिका घेतल्याने खळबळ आहे. बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. भेगडे यांचे समर्थकांनी अत्यंत आक्रमक भाषणे करून आपल्या भावना व्यक्त केल्या. खासदारांनी दहा वर्षांत केलेल्या कामात कुठेही भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही अशी खंत सर्वांनी व्यक्त केली. मावळची उमेदवारी बदला अन्यथा आम्ही काम करणार नाही. केवळ आणि केवळ युती धर्म पाळायचा म्हणत असे चालणार असेल तर ते आम्ही चालून घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. त्वरीत निर्णय घेतला नाही तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील, असेही सांगण्यात आले.

भाजपला उमेदवारी मिळाली नाही तर…
बाळा भेगडे यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मावळ तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी अत्यंत आक्रमक दिसले. बारणेंच्या यंत्रणेत भाजपचा एकही कार्यकर्ता दिसणार नाही, काण करणार नाही. कार्यक्रमाला एकही कार्यकर्ता दिसणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

पूर्वी खेड लोकसभा मतदारसंघ असताना शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, नंतर मावळ मतदारसंघ तयार झाला त्यावेळी दिवंगत गजानन बाबर यांनी भाजपने निवडूण दिले. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये श्रीरंग बारणेंना उमेदवारी दिली होती ती सुध्दा भाजपमुळे होती. दहा वर्षांत त्यांनी काय काम केले, असा लेखाजोखाच कार्यकर्त्यांनी मांडला. बारणे यांनी पदे देताना आणि निधी वाटप करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरले. प्रचार करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वसात घेऊ असे आश्वासन दिले होते, प्रत्यक्षात निकालानंतर एकही काम केले नाही की कोणाला विश्वासात घेतले नाही. दोन्ही वेळेस तोच अनुभव आला झाले. बारणेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊनच निधी वाटप केल्याने नाराजीचा सूर होता.

पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांचासुध्दा खासदार बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याचा संदर्भ यावेळी देण्यात आला. एका पदाधिकाऱ्याने स्पष्टच सांगितले की, पिंपरी चिंचवड शहर भाजपाध्यक्ष शंकर जगताप यांच्याशी आमचे बोलणे झाले आणि ते सुध्दा नाराज असून आमचे कार्यकर्ते काम करणार नाहीत, असे स्वतः जगताप यांनी म्हटल्याचे उघड केले. मावळ लोकसभा उमेदवार बदलासाठी आपण उठाव केला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मेसेज केला पाहिजे. तुमचा शिवसेनेचा उमेदवार येथे यावेळी निवडूण येणार नाही, असे सांगितले पाहिजे. वेळ प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी नमो एपवर थेट मोदी यांच्या पर्यंत आपल्या भावना पोहचवाव्यात, असेही आवाहन कऱण्यात आले.

खसादार श्रीरंग बारणे यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते नाहीत की बूथ पातळी पर्यंतची यंत्रणा नाही. दोन्ही वेळेस भाजपची यंत्रण आणि सर्व कार्यकर्त्यांची ताकद वापरली आणि नंतर साधे विचारलेसुध्दा नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. सर्वांच्या मनात हे प्रश्न आजही कायम आहे. आजही गावागावांतून त्यांचे चार कार्यकर्तेसुध्दा नाहीत. आता मते मागायला आले तर बारणे यांना उमेदवारी दिली तर आम्ही नोटा ला मतदान करू, असा इशारा दिला.बाळा भेगडे उमेदवार नसतील तर एकाही उमेदवाराला मतदान करायचे नाही, असाही निर्णय यावेळी कऱण्यात आला.