खासदार बारणे यांनी घेतले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

0
160

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला प्रारंभ केला आहे.

भाजप, शिवसेना महायुतीकडून मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत जाऊन आजी, माजी आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

दरम्यान, सोमवारी (दि. १) खासदार श्रीरंग बारणे यांनी अलिबागमधील रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार आणि महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

डॉ. आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांच्या भोवती सकारात्मक ऊर्जा आहे. या ऊर्जेची अनुभूती आजच्या या भेटीत झाल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.