खळबळजनक… विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार…!

0
264

बीड, दि.20 (पीसीबी) – बीडमध्ये एका विधवा महिलेवर सात जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ करून महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स रिक्षामध्ये विसरली होती. ती परत देण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने महिलेच्या घरात प्रवेश करत महिलेवर आत्याचार केला. याचा व्हिडीओ काढून त्याने त्या महिलेला ब्लॅकमेल करत इतरांना देखील शारिरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.