खराब हवामानाचा पुणेकरांना फटका, सलग तिसऱ्या दिवशी १२ विमाने रद्द

0
59

पुणे, दि. १७ (पीसीबी) – उत्तरेत असलेल्या खराब हवामानाचा सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील विमानसेवेला फटका बसला आहे. पुण्यात येणारी आणि जाणारी अशी १२ विमाने मंगळवारी (ता. १६) रद्द करण्यात आली.

रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये प्रामुख्याने दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीवरून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि जाणारी अशी ५० विमाने रद्द झाली आहेत. तर अनेक विमानांना उशीर झाला आहे. यामध्ये मंगळवारी पुण्यात येणारी सात आणि पुण्यातून जाणारी पाच अशा बारा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

त्यामध्ये दिल्लीच्या सहा विमानांचा समावेश आहे, तर चंडीगड, गुवाहाटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. विमाने रद्द होण्याबरोबरच अनेक विमानांना उशीरदेखील झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.