कोयत्यासह 20 वर्षी तरुणाला अटक

0
404

भोसरी, दि.९ (पीसीबी) – कोयत्यासह एका 20 वर्षीय तरुणाला मोशी येथून अटक केली आहे.ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुरुवारी (दि.8) केली आहे.

प्रशीक राजीव वाघमारे (वय 20 रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय त्याच्या ताब्यात 250 रुपयांचा कोयता घेऊन फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडील कोयता जप्त केला व त्याच्यावर आर्म अक्ट अतंर्गत गुन्हा दाखल केला. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.