कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक

0
118

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – कोयता घेवून फिरणाऱ्या तडीपार गुंडाला चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.५) चिंचवड लिंकरोड येथे केली आहे.

अमन आजिम शेख (रा. पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार रोहित पिंजरकर (वय ३४) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तडीपार केले होते. असे असताना देखील आरोपीने बेकायदेशीर रित्या कोयता घेवून फिरत होता. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली यावेळी त्याच्याकडून कोयता जप्त केला. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.