कोयता घोवून घरातील सामानांची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
294

निगडी , दि. १६ (पीसीबी) : घरात घुसून कोयत्याने सामानाची तोडफोड करत दहशत पसरवल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी दोघावंर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.14) रात्री निगडी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रणव सुरेश कांबळे (रा. आकुर्डी) व हर्षल संजय लोहार (रा. तळेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती घरी अशताना आरोपी हातात कोयते घावून घरात आले व त्यांनी फिर्यादीच्या मुलाच्या नावाने आरडोओरड करत माझ्या बहिणी सोबत बोलणे बंद कर म्हणत घरातील सामानाची तोडफोड केली . तसेच फिर्यादीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.