कै.सोपानराव जयवंत भोईर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी महिला भजन व कॅरम स्पर्धेला मोठा प्रतिसाद

0
175

चिंचवड, दि. २ ऑगस्ट (पीसीबी) – कै.सोपानराव जयवंत भोईर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी महिला भजन व कॅरम स्पर्धा आयोजित केली जाते. गेली १९ वर्षे हि स्पर्धा अविरत चालू आहे. शहर व परिसरातून मोठ्या संख्येने महिला भजनी मंडळे या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. स्पर्धेची व्याप्ती आता वाढली असून यंदा तब्बल ४६ महिला भजनी मंडळांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रथमच हि स्पर्धा ३० आणि ३१ जुलै अशी दोन दिवस सुरु होती. मंगळवार दि. ३० जुलै रोजी सकाळी १० वा. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, अप्पा बागल यांच्या व परीक्षक ह.भ.प. मधुकर महाराज मोरे, ह.भ.प. संपदाताई फडके यांच्या हस्ते स्पर्धेचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. पहिल्या दिवशी २८ मंडळांनी तसेच दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी १८ मंडळांनी सादरीकरण केले.

एकूण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक ३१/०७/२०२४ रोजी सायं ६ वा मनीषा स्मृति निवास, भोईरनगर, येथे संपन्न झाला.सदर स्पर्धेत चिंचवड येथील मुक्ताई महिला भजनी मंडळ यांनी प्रथम पारितोषिक पटकविले. तर द्वितीय परितोषितचे मानकरी ठरले रहाटणी येथील मुक्ताई महिला भजनी मंडळ व ३ रा क्रमांक इंदिरानगर चिंचवड येथील जय संतोषी मा महिला भजनी मंडळ यांनी पटकाविला. भवानीमाता महिला भजनी मंडळ – सांगवी, जोगेश्वरी महिला भजनी मंडळ, श्री साकार महिला भजनी मंडळ-बिजली नगर, भक्तिरंग महिला भजनी मंडळ – काळेवाडी, स्वरगंगा महिला भजनी मंडळ यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त केली. श्री रोहित लोहार आणि श्री वैभव रायकर यांनी उत्कृष्ट तबलावादन केले. त्याबद्दल या प्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तबला वादक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला सौ. कस्तुरी जमखंडी यांना सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक हि वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली, परीक्षक म्हणून ह.भ.प. मधुकरराव मोरे (दादा) व ह.भ.प. संपदाताई फडके यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

     यावेळी भाऊसाहेब भोईर, मा नगरसेवक नाना काटे, श्री शत्रुघ्न काटे, अप्पा बागल, सुरेश भोईर, श्री विजय भोईटे, संतोष पाटील, जयराज काळे ई.मान्यवर उपस्थित होते. तसेच स्पर्द्धेच्या नियोजनात ह.भ.प नीलमताई शिंदे, दत्तात्रय साकोरे, सहदेव भोईर  सौ. प्रतिभा कंकाळे, अजय रावत,चव्हाण सर, सुप्रिया भिंगारे, अनिता गायकवाड, यांचे सहकार्य लाभले.