कॅनडा येथील विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक..

148

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून दोघांनी तरुणांकडून १३ लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते ७ जानेवारी २०२२ या कालावधीत खराळवाडी, पिंपरी येथे घडली.

दीपक रामधीरज यादव (वय ३१, रा. खराळवाडी, पिंपरी. मूळ रा नाशिक) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनदीप सिंग (रा. उत्तराखंड), पंकज अग्रवाल (रा. कानपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटी येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी १३ लाख २५ हजार रुपये घेऊन त्यांना अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांनी दिलेले पैसे परत न देता फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.