कुरियर बॉयला मारहाण करत पार्सल मधील एअर गन घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना अटक

0
146

कुरियर बॉयलर मारहाण करून त्याच्या हातातील पार्सल फोडून त्यातील एअरगन घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे ही घटना सोमवारी (दि.20) सायंकाळी वाकड येथील हब स्पोर्ट्स इक्विपमेंट्स शॉप येथे घडली.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी अक्षय उर्फ बाळा लहू शिंदे (वय 30) प्रशांत चव्हाण (वय 40) दोघे राहणार वाकड या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रवींद्र तुकाराम ताठे (वय 58 रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या स्टोअरचा कुरिअर बॉय अमित कुमार यादव हा कुरिअर पार्सल घेण्यासाठी देते आला असता आरोपीही त्याच्या पाठोपाठ आले. त्यांनी यादवला दमदाटी करत त्याच्या हातातील पार्सल फोडून त्यातील एअर गन जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पाठलाग केला असता आरोपी तिथून पळून गेले यामध्ये एअर गनचा बॉक्स तुटून नुकसान झाले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे .