कुत्र्याचा पाय का मोडलास म्हणत एकास मारहाण

180

चाकण, दि. १७ (पीसीबी) – कुत्र्याचा पाय का मोडलास असे म्हणत एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री नेहरू चौकाजवळ, चाकण येथे घडली. नितीन गुलाब पवार (वय 25, रा. खंडोबा माळ, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितेश अनिल गोतारणे (रा. खंडोबा माळ, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते त्यांची रिक्षा घेऊन जात असताना आरोपीने त्यांना अडवले. तू कुत्र्याचा पाय का मोडलास असे म्हणत आरोपीने शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीस मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.