कुख्यात गुंडाबरोबरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा सेल्फी व्हायरल

0
177

– चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची संजय राऊत यांची फडणवीस यांच्याकडे मागणी

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन शिवेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका गंभीर गुन्हे असलेल्या असलेल्या आरोपीनं सेल्फी घेतला आहे. हा फोटो शेअर कर राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य, असं ट्वीट राऊतांनी केलंय. तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे बाळराजे म्हणजे श्रीकांत शिंदे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा अशी मागणी देखील राऊतांनी फडणवीसांकडे केलीय.

ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले राऊत?
संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. गृहमंत्री देवेंद्र जीयालाच म्हणतात गुंडांनी, गुंडांसाठी चालवलेले राज्य. नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत. हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच. हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा अशी मागणी संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केलीय.