किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

0
299

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून महिलेला चार जणांकडून मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.४) भोसरी येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यासीन शेख, अरमान शेख, व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी घरासमोरील चूल मोडून पाणी सांडले याचा जाब फिर्यादी यांनी विचारला. याचा राग येवून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत डोक्यात वीट मारून जखमी केले. यावेळी फिर्यादीच्या सासू दिर यांनाही आरोपींनी हाताने मारहाण केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे