किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार

0
183

तळेगाव दाभाडे, दि. ३० (पीसीबी) – आईला शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे मधील रणजितसिंह दाभाडे नगर येथे घडली.अंकुश रमेश कांबळे (रा. रणजितसिंह दाभाडे नगर, तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज नागनाथ तुपसुंदर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे त्यांच्या मित्रासोबत रविवारी रात्री घरी जेवण करीत होते.

त्यावेळी आरोपी सुरज याने फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ केली. त्याचा कांबळे यांनी सुरज याला जाब विचारला. त्यावरून सुरज याने कांबळे यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, धमकी आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.