किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, मारहाणीत मुलाचा मृत्यू, एकाला अटक

0
380

चापट मारली या कारणावरून दोन भावांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.21) चिंचवड येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मिथुन उर्फ भारत मधुकर सिरसाठ (वय 38 रा. चिंचवड) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार अतिश भारत सिरसाठ (दोघे रा.चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजकुमार कसबे (वय 28) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार याने मिथूनकडे सिगारेट पिण्यासाठी मागितली यावेळी मिथुन याने देण्यास नकार दिला. यावेळी राजकुमार ने मिथुनच्या डोक्यात चापट मारली. याचा राग मनात धरून आरोपींनी राजकुमाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीमुळे राजकुमार याचा मृत्यू झाला,असे फिर्यादी म्हटले आहे. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.