काळेवाडी फाटा येथून तरुणाला कोयत्यासह अटक

0
280

काळेवाडी फाटा येथून पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला कोयत्यासह अटक केली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी (दि.10) केली आहे.

प्रितम नंदू अवतारे (वय 26 रा.पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आशिष बोटके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवान्या शिवाय परिसरात हत्यार बंदी असताना देखील त्याच्या ताब्यात घेवून फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा कोयता जप्त केला आहे. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीवर गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.