कार भाड्याने घेण्याच्या बहाण्याने फसवणूक

0
302

काळेवाडी, दि. २३ (पीसीबी) – कार भाड्याने घेतो असे म्हणून चार लाखांची कार घेऊन एकजण पसार झाला. ही घटना 15 सप्टेंबर रोजी विजयनगर काळेवाडी येथे घडली.

बाबाराम गोविंद चव्हाण (वय 30, रा. विजयनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाण याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची कार (एमएच 16/एटी 5393) भाड्याने घेण्याचा बहाणा करून भाडेकरारनामा केला. त्यानंतर कार घेऊन जात ती परत न देता तसेच भाडे न देता फिर्यादी यांची चार लाख रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.